Together..(2025)
| Labels: Together..(2025) |#mbkg#specialhorror
(सिनेमा विषयक)
हॉलिवूड मध्ये बॉडी हॉ*रर हा प्रकार बराच प्रसिद्ध आहे....म्हणजे एक वेगळा चाहता वर्ग ह्या सिनेमांचा आहे.....बॉडी हॉ*रर म्हणजे विचित्र असे मानवी जीव....हे जीव निर्माण केले जातात किंवा काही विधी करून जन्माला येतात.…..ह्यांचे चेहरे खूपच भयानक असतात....सगळी कथा ह्या विकृत चेहर्याभोवती फिरत असते काही काही चित्रण वर्णन एवढं भयानक असते की किळसवाणे वाटते.....पण विषय वेगळे वेगळे हाताळले असल्याने असे सिनेमे बघायला खूप इंटरेस्टिंग असतात.....मागील वर्षीच्या द सबटन्स ह्या सिनेमा नंतर ह्या प्रकारातील टूगेदर हा सिनेमा प्रचंड आवडला.....द सबटन्स विषयी मी लिहल आहे खाली कुठेतरी हा रिव्ह्यू वाचू शकता.......
टूगेदर ह्याचा अर्थ होतो एकत्र....पण हे एकत्र येणे खूप भयानक आहे.....आणि दोघांनी एकत्र येण्याची क्रिया एवढी भयानक अमानवी दाखवली आहे हे बघून थक्क व्हायला होते.....मिली ही एक प्राथमिक शाळेची शिक्षिका असते ती आपल्या बॉयफ्रेंड टीम बरोबर लिव्ह इन मध्ये राहत असते टीम एक म्युझिशियन असतो....मिलीला एका शाळेत जॉब लागतो ती शाळा एका खेडेगावात असते बाजूलाच जंगल असते....त्या जंगलात काही दिवसांपूर्वी एक कपल गायब झाले असते....मिली आणि टीम एकेदिवशी त्या जंगलात ट्रेकिंगला जातात....अचानक त्यांच्या लक्षात येत की त्या जंगलात त्यांचा रस्ता चुकला आहे....वरून जोराचा पाऊस अचानक सुरू होतो.....अचानक टीम एका खड्ड्यात पडतो त्याला बाहेर काढता काढता मिली सुद्धा त्या खड्ड्यात पडते....एक जुनी इमारत असते ती बाजूलाच एक काळी गुहा असते....त्याच्या मधोमध एक पाण्याचे तळे असते.....त्या गुहेच्या वर चर्च सारखी एक घंटा लटकली असते.....बाहेरचा पाऊस बघता मिली आणि टीम तिथेच वस्ती करण्याचा निर्णय घेतात....टीमला तहान लागली असते त्यामुळे त्या गुहेतील तळ्यातून तो पाणी पितो.....पाणी पिल्यानंतर त्याला भयानक भास होऊ लागतात....अस वाटू लागतं की ती गुहा जिवंत आहे आणि एखाद्या जिवंत माणसाप्रमाणे धड धड करत आहे....सकाळी जेव्हा दोघे उठतात तेव्हा दोघांचे पाय एकमेकाला चिटकलेले असतात.....खूप जोर लावल्यानंतर त्यांचे पाय वेगळे होतात.....सकाळ झाली असते वेलींचा आधार घेत ते दोघे त्या अंधाऱ्या गुहेतून बाहेर पडतात.....आता टीम ने तिथून पाणी पिले असते त्यामुळे टीमला भयानक स्वप्ने पडू लागतात....तो मिली कडे सतत आकर्षित होत राहतो....मिली पासून थोडं लांब गेलं की टीमला अस्वस्थ वाटू लागतं....मिली टीमचे हे वागणे बघून अस्वस्थ होते.....एकेदिवशी मिली आणि टीम मध्ये शारीरिक संबंध घडून येतात त्यानंतर आता मिलीला सुद्धा त्रास सुरू होतो ती सुद्धा एखाद्या चुंबका सारखी टीम कडे आकर्षित होऊ लागते....एक सिन मध्ये तर त्याचे हात एकरूप होतात.....आता ह्यानंतर टीम आणि मिली ह्या श्रापा पासून कशी मुक्तता करतात की ते दोघे शिकार बनतात आणि एक भयानक जीव बनतात हे ह्या सिनेमात बघायला मज्जा येईल
हा सिनेमा एक उत्कृष्ट बॉडी हॉ*रर सिनेमा आहे असे चित्रपट बघताना कधी कधी स्टोरी डोक्यावरून जाते पण ह्या मुव्हीची स्टोरी सरळ रेषेत रंजक आहे.....तुम्हाला असे सिनेमे बघायला आवडत असतील तर जरूर बघा....बाकी ह्या सिनेमात न्यू*ड सीन्स...भयानक दृशे आहेत.....ज्यांना असे सिनेमे बघायला आवडत असतील त्यांनीच बघावा....बाकी मला हा सिनेमा खूप आवडला
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment